Thursday, October 8, 2026
spot_img
Home रत्नागिरी मारुतीमंदिर व कुवारबाव येथे  वाहतुकीस अडथळा, २ वाहन चालकांविरोधात गुन्हा

मारुतीमंदिर व कुवारबाव येथे  वाहतुकीस अडथळा, २ वाहन चालकांविरोधात गुन्हा

रत्‍नागिरी:- शहरातील मारुतीमंदिर व कुवारबाव सार्वजनिक रस्त्यावर वाहन लावून वाहतूकीस व रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या दोन चालकांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 ते 8.15 वा.सुमारास करण्यात आली.

विनित मधुकर पावसकर (५०, रा. गोळप, तेरवणकरवाडी, रत्नागिरी) व रविंद्र सुर्यकांत बाकाळकर (३०, रा. राजापूर वरची पेठ, राजापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयित चालकांची नावे आहेत. शांतीनगर ते मारुती मंदिर ते कुवारबाव रस्त्यावर संशयित चालकांनी आपली वाहनेे सार्वजनिक रस्त्यावर वाहतूकीस व रहदारीस अडथळा होईल अशा पध्दतीने उभी केली होती. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमोद कांबळे व सहायक पोलिस फौजदार राजेश भुजबळराव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.