Sunday, October 4, 2026
spot_img
Home रत्नागिरी समुद्री सापाचा दंश झाल्याने खलाशी अत्यवस्थ

समुद्री सापाचा दंश झाल्याने खलाशी अत्यवस्थ

रत्नागिरी:- बोटीवर मासेमारी करत असताना समुद्री साप चावलेल्या खलाशाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संदेश मादू राणजे (वय ४८, रा. कलासरी- वरचापाडा, जि. पालघर) असे समुद्री साप चावलेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना ३० सप्टेंबरला सकाळी सहाच्या सुमारास जैतापूर येथे समुद्रात असताना घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदेश राणजे हा बोटीवर मासेमारी करत असताना त्याला समुद्री सापाने दंश केला. तात्काळ त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र जैतापूर येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.