आजारपणाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या?
रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे येथे ६० वर्षीय वृद्धाने दीर्घकालीन आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. दीर्घकालीन आजारामुळे नैराश्य आल्याने माधव आठवले(वय ६०) यांनी गळ्यासमोर बंदूक लावून चाप ओढत आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे.
कोतवडे घारपुरेवाडी येथे ही घटना घडली असून नेमका हा प्रकार कोणत्या कारणातून घडला याचा तपास ग्रामीण पोलिस करत आहेत. आत्महत्या करण्यामागे नेमके कारण काय याचा शोध देखील घेतला जात असून ही आत्महत्या की घातपात याचा शोध पोलिस यंत्रणा घेत आहेत.









