Thursday, July 9, 2026
spot_img
Home रत्नागिरी कर्ला येथे चिंचेचे झाड पडून दोघे जखमी

कर्ला येथे चिंचेचे झाड पडून दोघे जखमी

रत्नागिरी:- शहरानजीकच्या कर्ला येथे जुने चिंचेचे झाड सोसाट्याचा वाऱ्यामुळे उमळून पडले. यामध्ये दोघं जखमी झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सायाम सज्जाद भाटकर (वय ७) व शाहिस्ता सज्जाद भाटकर (वय ३० दोघेही रा. जुना फणसोप, रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना मंगळवारी (ता. ७) दुपारी दोनच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाहिस्ता या जूना फणसोप येथून आपल्या आईला भेटण्यासाठी कर्ला येथे आल्या होत्या. त्या येत असताना दुपारच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तेथील चिंचेचे झाड उमळून पडले. यामध्ये सायाम व शाहिस्ता या जखमी झाल्या. तात्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ठिक आहे. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.