Tuesday, May 19, 2026
spot_img
Home रत्नागिरी नाचणे-एकतानगर येथील तरुणाची आत्महत्या

नाचणे-एकतानगर येथील तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील नाचणे-एकता नगर येथील तरुणाने खोलीतील फॅनच्या हुकाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. राहूल नंदकिशोर मुळे (वय ३७, रा. एकता वसाहत, शांतीनगर-नाचणे, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १६) रात्री नऊच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार व मृत मुलाचे वडिल नंदकिशोर मनोहर मुळे यांनी दिलेल्या खबरीनुसार राहूल याला मायग्रेनचा त्रास होता. त्यामुळे त्याचे लग्न होत नव्हते तो नेहमी नैराश्येत असायचा शनिवारी तो घरीच होते. आम्ही दोघे उभयता सायंकाळी साडेपाच वाजता प्रथम चिरायु हॉस्पिटल येथे राहूल यांची एमआरआय ब्रेन स्क्रिनींग टेस्टची चौकशी करुन आठवडा बाजार येथून घरी परत आलो. घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप होते. दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला तर राहूल दिसला नाही. तसेच आजू बाजुच्या परिसरात शोध घेतला. त्यानंतर पत्नी जिन्याने वरिल खेलीकडे गेली असता खोलीच्या दरवाजाला आतून कडी होती. त्यांनी शेजाऱ्यांच्या जीन्याने जावून खोलीचा मागील दरवाजा उघडला तर राहूल याने खोलीतील फॅनचे हुकाला नायलॉनचे दोरीने गळफास लावून लोमकळत होता. शेजारी व जमलेल्या लोकांनी राहूलला खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.