Thursday, May 14, 2026
spot_img
Home रत्नागिरी श्वसनाच्या त्रासाने वृद्ध महिलेचा मृत्यू

श्वसनाच्या त्रासाने वृद्ध महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- श्वनासाचा त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध महिलेला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. सुनिता मोतीराम पाटकर (वय ७०, रा. परटवली, पो. ओशीवळे, ता. राजापूर, रत्नागिरी) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ९) दुपारी साडेबाराच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनिता यांना प्रेशरचा आजार होता. सोमवारी त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. गावातील डॉक्टरकडे दाखवून तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी अभिषेक चंद्रकांत पाटकर यांनी राजापूर पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.