Sunday, May 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीतील ओसवाल नगर येथे वीज चोरी; गुन्हा दाखल

रत्नागिरीतील ओसवाल नगर येथे वीज चोरी; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील ओसवाल नगर येथे विद्युत चोरी केल्याप्रकरणी दोघा संशयितांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला चिखलगावात. फहाद इकबाल शाहा (रा. ओसवाल नगर, फ्लॅट नं १०२, रत्नागिरी) व एक अज्ञात (नाव गाव पुर्ण पत्ता माहित नाही) असे संशयित आहेत. ही घटना ८ एप्रिल २०२५ ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ओसवालनगर येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित फराद शाहा व त्याच्या सोबत एक अज्ञात यांनी महावितरण कंपनीची ११ महिने वीज युनिट ३९३६ केडब्ल्यूएच असे एकूण ७१ हजार १०० रुपयांच्या वीज चोरी केली. त्यांनी मिटर च्या पीसीबी (प्रिंटेड सर्किट बोर्ड) च्या मागील बाजूस फेरफार करुन अतिरिक्त सर्कीट जोडलेले आढळले. तसेच पीसीबी च्या वरती सी-१० ची वायर सोल्डर केलेली आढळली. तसेच मीटर टर्मिनल च्या वरच्या बाजूस छिद्र आढळून आले. जेणेकरुन मिटर मंदगतीने फिरेल व मिटरवर वीज बिलाची नोंद कमी दर्शविली जाईल अशी सहेतुक व्यवस्था दिसून आली. या प्रकरणी फिर्यादी सहायक अभियंता महावितरण शाखा शिरगाव निरज विलासराव देशमुख (वय ३८, रा. हिल टॉप अपार्टमेट शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.