Saturday, November 28, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत महावितरण, वन विभाग धारेवर

रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत महावितरण, वन विभाग धारेवर

रत्नागिरी:- रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत शुक्रवारी वन विभाग आणि महावितरणच्या भोंगळ कारभाराचे चांगलेच वाभाडे काढण्यात आले. पकडलेले बिबटे कुठे सोडतात, या साध्या प्रश्नावर वन अधिकाऱ्यांनी ‘माहिती देता येणार नाही’ असा पवित्रा घेतल्याने, “मग लोकांची गुरं-कुत्री-कोंबड्या कशा वाचवायच्या? तुम्हीच तज्ज्ञ आहात, तुम्हीच उपाय सांगा!” असे म्हणत सभापती आणि सदस्यांनी त्यांना फैलावर घेतले. दुसरीकडे, नाणीज येथील ग्राहकाला तब्बल ५ लाखांचे वीज बिल आल्याच्या मुद्द्यावर, “ग्राहकाने म्हणणे मांडले नाही, ती जबाबदारी आमची नाही तर तुमचीच आहे,” असे बिनधास्त उत्तर महावितरणच्या अधिकाऱ्याने दिल्याने सभागृहात संतापाचा भडका उडाला आणि अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावण्यात आले.

पंचायत समितीची सभा शुक्रवारी सभापती प्रवीण पांचाळ आणि उपसभापति गजानन धनावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सर्व सदस्य आणि खातेप्रमुख उपस्थित होते. यावेळी विषय पुत्रिकेवरील विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. तेव्हा वन विभागाचा आढवा घेण्यात आला. यावेळी सभापती श्री. पांचाळ म्हणाले, तुम्ही रानपाट येथील बिबिट्या पकडुन तो जाकादेवीत सोडला का. या प्रश्नावर वन अधिकारी म्हणाले, याची माहिती आम्ही सांगू शकत नाही. त्यानंतर सदस्य वैभव पाटील म्हणाले, याबाबत मी गेल्या सभेपासून तुमच्याकडे माहिती मागत आहे. तरी तुम्ही देण्यास टाळाटाळ करत आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्हाला माहिती द्यायला तुम्हाला काय अडचन आहे. आम्हाला याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र देऊन येथील अधिकारी बदलण्यास सांगू. यावर सभापती पांचाळ म्हणाले, मग तुम्ही यावरील उपायोजना काय ते सांगा. कारण ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांची गुर, कोंबड्या, शेळ्या बिबट्या फस्त करत आहे. त्यांना भारपाई मिळत नाही. त्यांचा उपजिवेकेचे साधन खुंटते. यावर वन विभागाचे अधिकारी म्हणाले, तुम्ह सर्व सदस्य यामध्ये तज्ज्ञ आहात तुम्हीच यावर मार्गदर्शन करा. अधिकाऱ्यांच्या या उत्तराने सर्वच आवाक झाले. आहो वन अधिकारी तुम्ही आहात की आम्ही, उपाययोजना तुम्ही आमला सांगायला हाव्या. तुम्ही धन्य आहात जागेवर बसा
त्यानंतर महावितरण कंपनीने आपला आढावा दिली. यावेळी वैभव पाटील यांनी नाणीज येथील एका वीज ग्राहकाला १ लाख रुपये वीज बिल आहे आहे. आता दुसऱ्या महिन्याला त्याला ५ लाख बील आहे आहे, ही कोणती पद्धत आहे. वीज अधिकारी म्हणाले, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. परंतु ग्राहकांनी आमच्याकडे आपले म्हणणे दिले का नाही. मग ग्राहक आमच्यापर्यंत आला पाहिजे. सभापती पांचाळ म्हणाले, मग महावितरण कंपनी म्हणून तूमची काही जबाबदारी नाही का. की तुम्ही फक्त वीज बिल वसूल करणार आणि एक महिना थकविला की कनेक्शन तोडायला येणार. हे बरोबर नाही. तुमची ही मनमानी थांबली नाही, तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असे श्री. पांचाळ यांनी सुनावले.