Friday, November 27, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चिपळूण येथील कोयता हल्लाप्रकरणी तिघांना अटक

चिपळूण येथील कोयता हल्लाप्रकरणी तिघांना अटक

चिपळूण:- शहरातील गोवळकोट परिसरातील बायपास एन्रॉन पूल येथे बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सात जणांनी पाच जणांवर धारधार कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली होती. यात तिघेजण गंभीररित्या जखमी झाले असून याप्रकरणी त्या सात जणांवर चिपळूण पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

अब्दुल बाबासाहेब शेख (६७), खालीद अब्दुल शेख (४२), साहिल अब्दुल शेख (३१), शाहिद अब्दुल शेख (२१), सिकंदर अब्दुल शेख (४५, सर्व आफ्रिन पार्क गोवळकोट), रुबीना जमीर मुजावर (३८, गोवळकोट रोड), अमन फारुख शेख (२४, अस्मीना अपार्टमेंट गोवळकोट रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यापैकी अब्दुल शेख, अमन शेख, रुबीना मुजावर या तिघांना अटक केली. या कोयती हल्ल्यात रोहन साबळे, फैजान चौगुले, सऊद चौगुले, सलमा चौगुले, सानिया फैजान चौगुले (२२, सर्व खेर्डी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. यामध्ये रोहन साबळे, फैजान चौगुले, सऊद चौगुले हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबतची फिर्याद सानिया फैजान चौगुले (२२, खेर्डी) यांनी दिली आहे.

सानिया यांनी फैजान चौगुले याच्याशी प्रेमविवाह. केला आहे. बुधवारी सानिया व फैजान चौगुले हे भेंडीनाका येथून जात असताना त्यांची दुचाकी बंद पडली. त्यावर अब्दुल शेख हा त्याच्याकडे बघून हसला. यावेळी फैजान याने त्याला याबाबतची विचारणा केली असता त्याने फैजान याचा शर्ट पकडून धक्काबुक्की करत त्याला शिवीगाळ केली. या घटनेची माहिती सानिया यांनी सासूला फोन करुन दिली व कुटुंबातील सर्वांनी भेंडीनाका येथे येण्यास सांगितले. त्यावेळी सलमा चौगुले हिने फैजान यास वरील ७ जण आम्हाला गोवळाकोट बायपास एन्रॉन पूलाजवळ कोयता, लोखंडी रॉडने मारहाण करत असल्याचे सांगितले. त्यानुसार फैजान व सानिया हे दोघेजण त्याठिकाणी गेले असताना त्यां ७ जणांनी त्या दोघांसह अन्य तिघे अशा पाच जणांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयता व लोखंडी रॉ ड ड जबर जबर मारहाण केली. या हल्ल्यात रोहन साबळे, फैजान चौगुले, सऊद चौगुले हे गंभीर जखमी झाले. सानिया चौगुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अब्दुल शेख, खालीद शेख, साहिल शेख, शाहिद शेख, सिकंदर शेख, रुबीना मुजावर, अमन शेख याच्यावर गुन्हा दाखल केला. यानंतर ते . ७ जण गायब झाले होते. पोलिसांनी त्यापैकी अब्दुल शेख, अमन शेख, रुबीना मुजावर या तिघांना बुधवारी रात्री अटक केली. न्यायालयाने सोमवारपर्यंत कोठडी सुनावली