Wednesday, November 25, 2026
spot_img
Home चिपळूण चिपळुणात भरदिवसा कोयत्याने सपासप वार; तिघे जखमी

चिपळुणात भरदिवसा कोयत्याने सपासप वार; तिघे जखमी

चिपळूण:- शहरातील एन्रॉन पुलाखाली दोन कुटुंबीयात हाणामारी झाली. या घटनेत कोयत्याने सपासप वार केल्याने तिघेजण जखमी झाले आहेत. या जखमींना चिपळूण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. भर दिवसा ही घटना घडल्याने चिपळूणमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एन्रॉन पुलाखाली दोन कुटुंबीय जमले होते. यावेळी दोघांकडून अन्य काहींवर कोयत्याने सपासप वार केले जात होते. यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. फैजान चौगुले (२८), सौद चौगुले (२५) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. मात्र, भरदिवसा ही घटना घडल्याने चिपळूणमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी गर्दी जमा झाली होती.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले. परंतु, चिपळूणमध्ये प्रथमच कोयत्याने सपासप वार करण्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी उपस्थित महिलांकडून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, हल्लेखोर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हा प्रकार कोणत्या कारणातून घडला ? हे अद्याप समोर आलेले नाही. तर या घटनेची सायंकाळी उशिरापर्यंत येथील पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. त्यामुळे अधिक तपशील समजू शकला नाही. मात्र, चिपळूणमध्ये कोयत्याने भर दिवसा करण्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.