Sunday, November 22, 2026
spot_img
Home गुन्हेगारी गावतळे येथे सलून व्यावसायिकावर हल्ला

गावतळे येथे सलून व्यावसायिकावर हल्ला

गावगुंडाची दहशत माजविण्याचा प्रयत्न

दापोली:- तालुक्यातील गावतळे येथे सलूनमध्ये काम करत असताना एका व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत येऊन लाकडी रिपने हल्ला केल्याची घटना गुरुवारी दि. १९ नोव्हेंबर २०२६ दुपारी घडली. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​फिर्यादी शुभम संतोष शिंदे वय ३०, रा. गावतळे हनुमानवाडी, ता. दापोली हे सलून व्यावसायिक आहेत. गावतळे बाजारपेठ येथे त्यांचे सलूनचे दुकान आहे.१५ नोव्हेंबर रोजी सौरभ भार्गूराम म्हाब्दी रा.गावतळे हनुमानवाडी, ता. दापोली याने मद्य प्राशन करून शुभम याच्या वडिलांना संतोष धोंडू शिंदे यांना केस कापण्यास भाग पाडले होते, तसेच केस कापण्याचे पैसेही न देण्याची धमकी दिली होती.असे तक्रारीत नमूद आहे.

​यानंतर १९ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास शुभम शिंदे हे सलूनमध्ये ग्राहकाची दाढी करत असताना सौरभ म्हाब्दी हा पुन्हा दारू पिऊन तेथे आला व शुभम बेसावध असताना पाठीमागून हातातील लाकडी रिपने मारहाण केली. या मारहाणीत शुभम शिंदे याच्या डोक्याला पाठीच्या डाव्या बाजूला व हाताला. जबरी मार बसला व रक्तस्राव झाला.तसेच आरोपी सौरभ भार्गुराम म्हाब्ददी
याने शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

​या घटनेनंतर गावातील प्रकाश पवार यांनी जखमी शुभम शिंदे यांना दुचाकीवरून गावतळे येथील खाजगी डॉक्टर पवन बयास यांच्याकडे उपचारासाठी नेले.व तेथून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

​या प्रकरणी शुभम शिंदे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०२५२ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ११८(१), ३५१(२) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार साक्षी संदीप गुजर करीत आहेत.

सौरभ भार्गुराम म्हाबदी हा मागील काही महिन्यांपासून गावतळे गावामध्ये मद्यधुंद अवस्थेत गुंडगिरी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. त्याने अनेक वादीवाद गावांमध्ये निर्माण केले आहेत.अनेकांना धमक्या दिल्या आहेत त्यामुळे भीतीचे वातावरण आहे.याबाबत पोलीस यंत्रणेला माहिती असूनही पोलीस यंत्रणा कोणता मोठा गुन्हा घडण्याची वाट पाहत आहे का असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे.