Sunday, November 22, 2026
spot_img
Home रत्नागिरी जयगड येथे निष्काळजीपणे दुचाकी चालविणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

जयगड येथे निष्काळजीपणे दुचाकी चालविणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड येथील जेएसडब्ल्यू फाटा रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या तरुणाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पराग प्रभाकर सागवेकर (वय ३९, रा. बागवाडी, जयगड, रत्नागिरी) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित तरुण हा दुचाकी निष्काळजीपणे चालवत असताना सापडला. या प्रकरणी पोलिस शिपाई रजनिकांत घवाळी यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.