Tuesday, September 29, 2026
spot_img
Home रत्नागिरी ‘जनशताब्दी’च्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात दोन तासांपासून रेल्वे रखडली

‘जनशताब्दी’च्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात दोन तासांपासून रेल्वे रखडली

मुंबई-मडगाव प्रवासात खोळंबा; पर्यायी इंजिन पाठविले

रत्नागिरी:- मुंबईहून मडगावच्या दिशेने निघालेल्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने रेल्वे पेण स्थानकातच रखडली आहे. मंगळवारी सकाळी सुमारे सात वाजल्यापासून जनशताब्दी पेण स्थानकात उभी असून, त्यामुळे मुंबई-मडगाव प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून पर्यायी इंजिन पाठविण्यात आले आहे. हे इंजिन जनशताब्दीला जोडल्यानंतर रेल्वे पुढील प्रवासाला रवाना होणार आहे. मात्र, पर्यायी इंजिन येऊन ते जोडण्याच्या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने रेल्वे सुमारे दोन तासांहून अधिक काळ पेण स्थानकातच थांबून आहे.

जनशताब्दी एक्स्प्रेसचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून, अनेक प्रवाशांना पुढील प्रवासाबाबत अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे. दीर्घकाळ रेल्वे स्थानकातच थांबून राहावे लागत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पर्यायी इंजिन जोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर जनशताब्दी पुढील प्रवासाला मार्गस्थ होणार आहे.