Thursday, August 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मारुती मंदिर येथील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तरुणांची हुल्लडबाजी

मारुती मंदिर येथील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तरुणांची हुल्लडबाजी

रत्नागिरी:- मध्यधुंद अवस्थेत मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाची अवमानना करून हुल्लडबाजी करणार्‍या 3 तरूणांना शिवप्रेमींनी रंगेहाथ पकडले आणि शहरात एकच वातावरण तापले. फोटो आणि रील काढण्याचा शौक पोलिसांनी जागच्या जागी जिरवला. मात्र या घटनेमुळे बुधवारी रात्री मारुती मंदिर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेले तीनही तरुण मूळचे पश्चिम बंगाल येथील रहिवासी असून ते सध्या कोकण नगर येथे वास्तव्याला आहेत. साजन फर्जन शेख (वय 26), समीर शेख (वय 26), व करीम शेख (वय 23) अशी त्यांची नावे आहेत. मारुती मंदिर येथील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यानजिक रील बनविण्यासाठी व फोटो शुट करण्यासाठी सर्व सामग्री घेवून ते मारूती मंदिर येथे आले होते. मात्र ही बाब शिवप्रेमींच्या निदर्शनास येताच त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.