Friday, May 15, 2026
spot_img
Home गुन्हेगारी चिपळुणात गांजा सेवन करणाऱ्यावर गुन्हा

चिपळुणात गांजा सेवन करणाऱ्यावर गुन्हा

चिपळूण:- शहरात गांजाचे सेवन करणाऱ्या प्रौढावर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील लक्ष्मण आरवट (५०, खेर्डी-शिगवणवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद रोशन शंकर पवार (चिपळूण पोलीस ठाणे) यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील हा शहरातील पाग येथील गणपती विजर्सन घाट येथे नदीकिनारी गांजा सेवन करत होता. यावेळी गस्तीवरील पोलिसांनी त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.