Monday, May 18, 2026
spot_img
Home गुन्हेगारी सहाय्यक वाहतूक अधिक्षकास मारहाण; गुन्हा दाखल

सहाय्यक वाहतूक अधिक्षकास मारहाण; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य मार्गपरिवहन मंडळ,रत्नागिरी आगार येथे सहाय्यक वाहतुक अधिक्षकास अज्ञात कारणातून मारहाण करत त्याच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार 25 ऑगस्ट रोजी दुपारी 3.45 वा.सुमारास मध्यवर्ती बसस्थानक रत्नागिरी येथील कार्यालयात घडली.

निखिल चंद्रशेखर नार्वेकर (36, रा.गोळपसडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात प्रद्युम्न दत्तात्रय शिरधनकर (56, रा.पांडवनगर-नाचणे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी दुपारी फिर्यादी हे रजिस्टर लिहिण्याचे सरकारी काम करत होते. त्यावेळी संशयिताने त्याठिकाणी येउन अज्ञात कारणातून फिर्यादीला उद्देशून तुला माज आला आहे. तुला सोडणार नाही, तुला बघून घेईन,तुला ठार मारीन अशी धमकी देउन शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांची मान टेबलवर दाबून मानेवर व पाठीवर हातांच्या ठोशाने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. या फिर्यादींचे शर्ट फाटले. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून तोडून नुकसान केले. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.