Saturday, November 21, 2026
spot_img
Home रत्नागिरी पावस येथे गावठी मद्यविक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा

पावस येथे गावठी मद्यविक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- पावस बाजारपेठ ते गोळप जाणाऱ्या पायवाटेवर घराच्या भिंतीच्या आडोशाला विनापरवाना हातभट्टीची दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत महिलेकडून ९४० रुपयांची ९ लिटर दारु जप्त केली. संशयित महिलेविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. १८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित महिला ही विनापरवाना गावठी हातभट्टीची दारु विक्रीच्या उद्देशाना स्वतःकडे बाळगलेल्या स्थितीत आढळली. या प्रकरणी महिला पोलिस हवालदार सरोज वंडकर यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पुर्णगड पोलिस अमंलदार करत आहेत.