Saturday, November 21, 2026
spot_img
Home Blog राजापूर बारसू खालचीवाडी येथील तरुण बेपत्ता

राजापूर बारसू खालचीवाडी येथील तरुण बेपत्ता

पाचल:- राजापूर तालुक्यातील बारसू खालचीवाडी येथील शुभम रवींद्र शिर्के (वय २७) हा तरुण गेल्या १४ नोव्हेंबर २०२६ पासून बेपत्ता झाला असून, याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यामार्फत त्याचा कसून शोध घेतला जात आहे.

बेपत्ता झालेल्या शुभम रवींद्र शिर्के याची उंची ५ फूट ८ इंच असून, बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहरा लांबट आणि केस काळे व छोटे आहेत. बेपत्ता होण्यापूर्वी त्याच्या अंगात मोती कलरचा फुल बाह्यांचा शर्ट होता. या वर्णनाचा तरुण कोठेही आढळून आल्यास किंवा त्याच्याबद्दल काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ राजापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. अधिक माहिती देण्यासाठी पोलीस निरीक्षक अमित यादव किंवा पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन राजापूर पोलीस प्रशासनाच्या वतीने कारण्यात आले आहे.