Wednesday, August 19, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरीत ऑनलाईन ट्रेडिंगच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक

रत्नागिरीत ऑनलाईन ट्रेडिंगच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक

कुवारबाव येथील धक्कादायक प्रकार

रत्नागिरी:- कमी वेळेत जास्त नफ्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एका दाम्पत्याची तब्बल ११ लाख ३७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २५ जून २०२६ ते २३ जुलै २०२६ या कालावधीत कुवारबाव येथे हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी १८ ऑगस्ट २०२६ रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी सोनल जगन्नाथ नाईक हिची फिर्यादी महिलेच्या पतीसोबत व्हॉट्सॲपवर ओळख झाली. होती. ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने फिर्यादी व त्यांच्या पतीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीच्या पतीच्या मोबाईलमध्ये ‘Julius Baer Mobile’ हे ट्रेडिंग ॲप्लिकेशन डाउनलोड करून लॉगइन करण्यास सांगण्यात आले होते. IPO व OTC ट्रेडिंगमध्ये कमी वेळेत भरगोस नफा मिळण्याचे आमिष दाखवून त्यांना सतत पैसे गुंतविण्यास भाग पाडण्यात आले. दुसरा आरोपी कुणाल सुमया याने ‘Julius Baer Mobile’ चा हेड असल्याचे भासवून, “कंपनीच्या नियमाप्रमाणे संपूर्ण रक्कम तुम्हाला भरावी लागेल,” असे सांगून वारंवार धमकावले व पैसे उकळले.
या प्रकारातण

फिर्यादीचे जॉईन्ट खाते यातून ११ लाख १७ हाजार रुपये आणि पतीचे खाते २०,००० रुपये असा एकूण ११ लाख ३७ रुपये इतकी फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सोनल जगन्नाथ नाईक आणि कुणाल सुमया यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (४), ३१९ (२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (C), (D) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.