खेड:- खेड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सफा मस्जिद परिसरात सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करणाऱ्या एका इसमाला खेड पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. ही कारवाई ४ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजण्याच्या सुमारास खेड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सोहेल इक्बाल ढगे हे परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना सफा मस्जिद चौक जवळील जस्नाईक कॉम्प्लेक्सच्या कट्ट्यावर एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत बसून गांजाचे सेवन करताना दिसून आली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सदर व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याचे नाव शकिल मोहम्मद फोपलोनकर (वय ५८, रा. भोस्ते, जलालशहा मोहल्ला, ता. खेड) असल्याचे निष्पन्न झाले. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीवर अमंली पदार्थ विरोधी कायदा १९८५ च्या कलम ८ (क) आणि २७ अन्वये गुन्हा रजि. नं. १९६/२०२६ नोंदवण्यात आला आहे. ५ जुलै २०२६ रोजी पहाटे १.०९ वाजता या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.









