Tuesday, May 12, 2026
spot_img
Home गुन्हेगारी कोतवडे येथे गल्लीत लाईट लावण्यावरून दोन गटात राडा

कोतवडे येथे गल्लीत लाईट लावण्यावरून दोन गटात राडा

रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे-सनगरेवाडी येथील दोन दिवसावर सनई चौघडे वाजणार असणाऱ्या लग्न घरातील गल्लीत लाईट लावण्यावरुन आज दोन गटात तुफान राडा झाला. यामध्ये पाच ते सहा जण जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या बाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्पर विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यत सुरु होती.

प्रसाद गणपत राणे (४३), प्रदिप श्रीकृष्ण राणे (४०), सुजाता संजय करडे (५०), सौ. समिक्षा प्रसाद राणे (४०), गणपत लक्ष्मण राणे (७५) व सायली दशरथ बारगुडे अशी जखमींची नावे आहे. ही घटना सोमवारी (ता. ११) दुपारी दोनच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोतवडे येथील राणे कुटुंबियांमध्ये दोन दिवसांनी लग्न होणार होते. त्यासाठी सर्व तयार करण्यात येत होती. घरासमोर लग्न मंडप तयार झाला. पण गल्लीत-रस्त्यावर लाईट लावण्यावरून दोन गटात राडा झाला. चक्क लग्न घरात येऊन हाणामारी झाली असल्याचे पुढे येत आहे. या राड्यात एकमेकांची डोकी फोडण्याचा प्रकार ही घडला आहे तर कुणाला मुका मार लागून जखमी झाले दुखापत झाली आहे. यामध्ये पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या राड्यातील नेमकं प्रकार काय झाला याची माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरा पर्यत परस्परविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.