Thursday, May 14, 2026
spot_img
Home खेड विनयभंगाच्या गुन्ह्यातून एकाची निर्दोष मुक्तता

विनयभंगाच्या गुन्ह्यातून एकाची निर्दोष मुक्तता

खेड:- विनयभंगांच्या गुन्ह्यातून किरण संजय तायडे यांची अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यांच्यावतीने ॲड. साबळे, ॲड. जयेश जाधव यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरला.

राजकीय व सामाजिक वादातून डुख ठेवत काही लोकांकडून तायडे यांच्या कार्यालयावर हल्ला करत जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली होती. याबाबत त्यांनी तक्रार दाखल केली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्यासह कुटुंबियांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. दबावाला बळी न पडल्याने अखेर त्यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली होती. विनयभंगाची खोटी तक्रार देण्यास भाग पाडल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.