Thursday, May 14, 2026
spot_img
Home गुन्हेगारी राखीव वनक्षेत्रात अनधिकृत वीजवाहिनी टाकल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा

राखीव वनक्षेत्रात अनधिकृत वीजवाहिनी टाकल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा

दापोली:- तालुक्यातील मौजे माड येथे राखीव वनक्षेत्रातील रस्त्याच्या कडेला महावितरण कंपनीमार्फत अनधिकृतपणे खड्डे खोदून वीजवाहिनी टाकल्याचे समोर आले आहे. या प्रकारावर दापोली वनविभागाने कारवाई करत संबंधित ठेकेदार श्रीकांत केशू साव्हाण (रा. दापोली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर रोजी ही घटना उघडकीस आली. दापोली वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पाणामा केबलसारखी वीजवाहिनी त्वरित वनक्षेत्रातून काढून टाकली तसेच खोदलेले खड्डे बुजवण्यात आले.

या प्रकरणी दापोली वनपाल रामदास खोत यांनी ठेकेदार श्रीकांत साव्हाण यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली. ही संपूर्ण कारवाई दापोली परिक्षेत्राचे वन अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक कोंगळे, वनरक्षक खेर्डी आणि वनरक्षक ताडील यांच्या पथकाने केली.