रत्नागिरी:- थेट विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र 2022-23 मध्ये नंबर 1 वर राहिल्यानंतर आता 2023-24 या आर्थिक वर्षांत सुद्धा पहिल्या क्रमांकावर आला आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यानंतर गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या विश्वासबद्दल सर्व गुंतवणूकदारांचे अभिनंदन तसेच भविष्यात महाराष्ट्रात येणाऱया गुंतवणूकदारांचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत ह्यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने 30 मे 2024 रोजी ही आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने गेल्या वर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यावर्षी प्राप्त केली आहे. 2022-23 आर्थिक वर्ष :1,18,422 कोटी 2023-24 आर्थिक वर्ष :1,25,101 कोटी आहे. 2023-24 या आर्थिक वर्षांतील महाराष्ट्रातील गुंतवणूक ही गुजरात मध्ये झालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक आहे. तर दुसऱया क्रमांकावरील गुजरात आणि तिसऱया क्रमांकावरील कर्नाटकच्या एकूण बेरजेपेक्षाही अधिक आहे.महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग दोन वर्ष पहिल्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्त्वात राज्यात महायुती सरकारची यशस्वी घौडदौड सुरु आहे आणि गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती आहे. भविष्यात महाराष्ट्रात येणाऱया गुंतवणूकदारांचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत ह्यांनी म्हटले आहे.