खांडोत्री-देऊळवाडी येथे विहिरीत सापडला प्रौढाचा मृतदेह

चिपळूण:- तालुक्यातील खांडोत्री-देऊळवाडी येथील विहिरीत प्रौढाचा मृतदेह आढळून आल्याची घटना धान रविवारी रात्री ९ च्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दीपक विश्राम कोदारे (५५, खांडोत्री-देऊळवाडी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक कोदारे जेवण झाल्यानंतर ते दारुच्या नशेत वाडीत असणाऱ्या सभेला जातो, असे सांगून घरातून निघून गेले. मात्र त्यांनी घराच्या बाहेर त्याची चप्पल व बॅटरी ठेवलेली होती. बराच वेळ झाला तरी ते घरी न आल्याने त्यांची पत्नी दिपाली कोद्वारे व मुलगा रोशन कोदारे यांनी वाडीत जाऊन शोध घेतला असता ते सापडले नाहीत. अखेर त्यांचे शेजारी असलेले सोमा रपशी यांच्या मालकीच्या विहिरीत दीपक कोदारे यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.