चिपळूण:- तालुक्यातील भिले- बौध्दवाडी येथे ४० वर्षीय तरूणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सतीश पांडुरंग सकपाळ (४०, भिले-बौध्दवाडी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. सतीशच्या घराशेजारी विजेचा खांब आहे. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास या खांबाला सतीशचा स्पर्श होताच त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. या घटनेनंतर तत्काळ उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई, दोन भाऊ असा परिवार आहे.