रत्नागिरी:- गवत मारण्याचे औषध घेतलेल्या तालुक्यातील तोणदे येथील तीन मित्रांपैकी अजून एकाचा मृत्यू झाला असून, तिसऱ्यावर कोल्हापूरमध्ये उपचार सुरू आहेत.
यातील विघ्नेश भाटकरचा काही दिवसांपूर्वी उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला होता. या घटनेतील समाधान पाटील याचाही मृत्यू झाला आहे. विषारी औषध घेतलेल्या तीन मित्रांपैकी विघ्नेश भाटकर याचा या आधीच मृत्यू ओढवला होता. या घटनेतील उर्वरित दोन मित्रांपैकी समाधान पाटील आणि सुदर्शन शिरधनकर या दोघांनाही अत्यवस्थ वाटू लागल्यामुळे त्यांनाही उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, या तिघांनी विषारी औषध नेमक्या कोणत्या कारणाने घेतले यामागील कारणाचा पोलिस करीत आहेत. हे तिन्ही तरुणीच्या तिशीच्या घरातील आहेत. या पैकी समाधानची प्रकृती खालावल्याने त्याला मुंबईत अधिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले असताना त्याचाही उपचारांदरम्यान मृत्यू झाला.