रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील तलावात बुडून १२ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, दि. १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.४० वाजण्याच्या सुमारास घडली. अभिषेक रमेश जंगम (वय १२, रा. जंगमवाडी वाटद, रत्नागिरी) असे बुडून मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मंगळवारी अभिषेक त्याच्या मित्रांसोबत खंडाळा येथील खंडाळेश्वर मंदिरासमोरील तलावात पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना अचानकपणे तो पाण्यात बुडाल्याने त्याच्या मित्रांनी त्याला पाण्याबाहेर काढून वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अभिषेकला तपासून मृत घोषित केले. या दुर्घटनेसंदर्भात जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.