रत्नागिरी:- ऐन गणेशोत्सवात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहर हादरलं आहे. चिपळूणमधील बहादूर शेख नाका परिसर येथे एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तरुणाची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय असून चिपळूणचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने हे चिपळूण पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हमीद शेख असे या तरुणाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हा हादरवून टाकणारा संपूर्ण प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
चिपळूण शहरातील बहादूर शेख नाका या गजबजलेल्या भागात हमीद शेख नावाच्या तरुणाचा मृतदेह मिळाल्याने चिपळूण हादरलं आहे. त्याची हत्या झाल्याचा संशय आहे. चिपळूण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. ऐन गणेशोत्सवच्या आनंदाच्या काळात चिपळूण शहरात या घटनेने खळबळ उडाली आहे.