गोळप येथे जागेच्या वादातून भावजयीला दांडक्याने मारहाण

रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप पिंपळवाडी येथे जागेच्या वादातून भावजयला दांडक्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास घडली. या घटनेची नोंद पूर्णगड पोलिसात करण्यात आली आहे.

संजय रामचंद्र शिंदे (६०, रा. गोळप पिंपळवाडी) असे मारहाण – प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात – आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित आरोपी संजय शिंदे व त्यांचा भाऊ यांच्यात जागेवरुन वाद सुरु होता. मागील काही दिवसांपूर्वी संजयच्या भावाने घरासाठी नवीन बांधकाम सुरु केले होते. याचा राग आल्याने संजयने भावजय व भावाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच ३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.४५ च्या सुमारास भावजयला लाकडी दांडक्याने मारहाण केली, अशी तक्रार पूर्णगड पोलिसात दाखल करण्यात आली. त्यानुसार संजयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.