रत्नागिरी:- राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणार्या क्रांतीज्योती सावित्री फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराची सोमवारी घोषणा झाली आहे. यामध्ये माध्यमिक शिक्षक पुरस्कारासाठी खेड तालुक्यातील जामगे येथील छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूलचे सहाय्यक शिक्षक डॉ. महादेव खोत यांना तर प्राथमिक शिक्षक पुरस्कारासाठी राजापूर करक येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा क्रमांक १ चे सहाय्यक शिक्षक सुभाष चोपडे यांची निवड झाली