रत्नागिरी:- शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकुल व मारुती मंदिर स्टेडियम तसेच चंपक मैदान येथील सार्वजनिक ठिकणी मद्य प्राशन करणाऱ्या तिघांविरुद्ध शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सनातन विलास शेरे (रा. सुभाष रोड, वरची आळी, रत्नागिरी) संदीप गोविंद शिवगण (रा. शवरेकरचाळ, धनजीनाका, रत्नागिरी) आणि उमेश चंद्रकांत देवरुखकर (रा. स्वप्नपूर्ती, शिवाजीनगर, रत्नागिरी) अशी तीन संशयितांची नावे आहेत. या घटना सोमवारी (ता. १२) सायंकाळी सात व आठच्या सुमारास प्रमोद महाजन क्रिडा संकूल परिसर व मारुती मंदिर स्टेडियम, चंपक मैदान येथे निदर्शास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सनातन व संदीप तसेच उमेश हे तिघे सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत असताना आढळले. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.