रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप नगर परिषद पाण्याच्या टाकीखाली बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. गोरख किसन हारमळ (७६, रा. कोद्रेवाडी बीड) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोरख हारमळ हे ४ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी साळवी स्टॉप येथील नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीखाली बेशुद्ध अवस्थेत पडले होते. स्थानिकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गोरख यांना तपासून मृत घोषित केले अशी नोंद करण्यात आली आहे.