रत्नागिरीत 25 ऑगस्ट रोजी भंडारी समाजाचे महाअधिवेशन

रत्नागिरी:- महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर मोठय़ा संख्येने वसलेला भंडारी समाज शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक विषयांवर मंथनासाठी एकत्र येणार आहे. त्यासाठी येत्या 25 ऑगस्ट रोजी या समाजो रत्नागिरीत महाअधिवेशन होणार आहे. त्यामध्ये समाजहिताचे काही ठराव समंत केले जाणार आहेत. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्यी माहिती अखिल भारतीय भंडारी महासंघाचे विश्वस्त आशिष पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोकण किनारपट्टीवर मोठय़ा संख्येने वसलेल्या भंडारी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाज एकत्र करणे काळाची गरज आहे. समाजाची शैक्षणीक, सामाजिक आर्थिक आणि राजकीय उन्नती साधायची असेल तर एकत्र येऊन भंडारी भविष्याचा वेध घेणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी रत्नागिरीत येत्या 25 ऑगस्ट रोजी या समाजाचे महाअधिवेशन होणार असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. येथील माळनाका शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेला पेडणेकर यांयासमवेत राजीव किर, दया चवंडे, ॲङ प्रज्ञा तिवरेकर, विलास भोसले, सुरेंद्र घुडे, नितीन तळेकर, दिपक तोडणकर, दिलीप भाटकर आदी उपस्थित होते.

कोकणात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा तसेच पुणे नांदेड या ठिकाणी भंडारी समाज वास्तव्यास आहे. अनेक मंडळांच्या माध्यमातून भंडारी समाजाचे सामाजिक कार्य चालू आहे. या सर्व मंडळाना एकत्र करून रविवार 25 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10:00 ते सायं. 5:00 यावेळेत येथील स्वा. वि.दा.सावरकर नाटय़गृह रत्नागिरी येथे महा अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक विषयांवर चर्चासत्र होणार आहे. या अधिवेशनाला सुमारे 1500 समाजबांधवीं उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक, भंडारी नेते अनिल होबळे, माजी मंत्री कालिदास कोळंबकर, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर, भंडारी समाज नेते नवीनचंद्र बांदिवडेकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, पत्रकार राजेश कोचरेकर, बिपीन मयेकर, सुभाष मयेकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन रत्नागिरी भंडारी समाजाच्या माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती भंडारी समाजाचे नेते राजीव कीर यांनी दिली.