रेल्वे प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स पळविली

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या ओक्खा एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या अहमदाबाद येथील महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० जूनला दुपारी तीनच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अल्का जिगुरकुमार शेखानी (३०, रा. मुल्लीनाथ प्रभू सोसायटी आदिनाथ नगर, ओढराव, अहमदाबाद) या रेल्वेच्या ओक्खा एक्स्प्रेसने प्रवास करत असताना त्यांची डेक्सवर ठेवलेली लेडीज पर्स अज्ञाताने पळविली. या प्रखरणी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.