सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन; तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूस सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण राजरत्न जाधव (२७, रा. नाचणे रसाळवाडी, रत्नागिरी. मुळ: कर्ली ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता.२०) रात्री आठच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्टेशन स्टॉपच्या मागिल बाजूस निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार संशयित मद्य प्राशन करत असताना पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यांच्या मद्य प्राशन करण्याचा कोणताही परवाना नव्हता. पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करुन नोटीस बजावली आहे.