खेड:- तालुक्यातील एका पीडित अल्पवयीन युवतीशी शरीरसंबंध ठेवत 6 आठवड्याची गर्भवती ठेवल्याच्या आरोपातून चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली येथील जगदीश रघुनाथ हिलम या संशयितास येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. संशयिताच्यावतीने ऍड. स्वरूप थरवळ यांनी काम पाहिले.
या पीडित युवतीशी संशयिताने ओळख वाढवत ती अल्पवयीन असतानाही तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यातून ती 6 आठवड्याची गर्भवती राहिली. त्यानुसार येथील पोलीस स्थानकात पोस्कोंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करून 30 मे रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्यावतीने ऍड. थरवळ यांनी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांनी केलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरत संशयितास जामीन मंजूर केला.