हातिवले, सावर्डेतील उत्खननाची होणार चौकशी

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील हातिवले, चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे कमी रॉयल्टी भरुन वारेमाप उत्खनन सुरु आहे.याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी एम. देवेंद्रर सिंह यांनी राजापूर, चिपळूण उपविभागिय अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहे.घटनास्थळाची पहाणी, पंचानामा करुन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले आहे. त्यामुळे बेसुमार उत्खनन करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.

राजापूर तालुक्यातील हातिवले येथे संपुर्ण डोंगर कापण्याचे काम सुरु आहे. त्यांनी मोजक्याच ब्रसची रॉयल्टी भरुन बेसुमार उत्खनन सुरु केले आहे. याची तक्रार आपल्याकडे दाखल झाली आहे. तर मुंबई-गोवा महामार्गवरून प्रवास करताना चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे समोरच डोंगर कापून उत्खनन सुरु असल्याचे आपण स्वत: पाहिले आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणचा अहवाल उपविभागिय अधिकार्यांकडून मागविण्यात आला आहे. त्यानंतर संबधितांवर कारवाईबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्रर सिंह यांनी सांगितले.

राज्यभरात पावसाला चांगलीच सुरुवात झाली आहे.जून, जुलै महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असेत. त्यादृष्टीने आवश्यक उपायोजना जिल्हा प्रशासन, पोलीस दलाने केल्या आहेत. तर राजापूर, खेड, चिपळूण पालिकेलाही आपत्तीपुर्व तयारी करण्याची सुचना देण्यात आली आहे. आपत्ती निवारणासाठी आवश्यक यंत्रसामुग्री घेण्याची सुचना देण्यात आली आहे. पोलीस दलामार्फत प्रत्येक पोलीस स्थानकाला प्रत्येकी एक लाकूड कटर, बॅटरी देण्यात आली आहे. जेणे करुन रस्त्यामधे झाडे कोसळल्यास ती तात्काळ बाजूला करुन वाहतुक सुरळीत करणे शक्य होईल.
राजापूर तालुक्यातील धुतपापेश्वर येथील एका वाडीला दरडीचा धोका आहे. त्या वाडीच्या वरच्या भागात भलामोठा दगड आहे. तो खाली आल्यास वाडीतील पन्नास घरांना धोका पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या वाडीतील ५० घरे स्थलांतरीत करण्यासाठी आवश्यक असलेल्या १६ कोटी रु. निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. खाजगी जागा खरेदी करुन पन्नास घरांचे पुनर्वसन केले जाणार असल्याचे श्री.सिंह म्हणाले.
याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले. आपत्ती निवारणासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे.राजापूर, खेड, चिपळूण येथे पूर आल्यास स्थानिकांच्या मदतीसाठी तीन नौका सज्ज ठेवण्यात आल्या आहे. तर एनडीआरफची टिम लवकरच चिपळूण येथे दाखल होणार आहे. त्यामुळे आपत्तीच्या काळात पोलीस दल सतर्क राहणार असल्याचे ते म्हणाला.