रत्नागिरी:- 15 जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ होत आहे. या नव्या शैक्षणिक पर्वाची उत्सुकता सर्व मुलांबरोबर पालक व शिक्षक वर्गाला लागली आहे. अशा शाळाप्रवेशोत्सवात आज 10 हजार 571 नवागतांचे शाळेत मोठय़ा डामडौलात स्वागत होणार आहे. आज 15 जूनपासून जिल्हा परिषदेच्या शाळा नव्या शैक्षणिक वर्षाच्या आरंभाने पुन्हा गजबजणार आहेत. त्यावेळी मुलांचे आनदंमयी स्वागत करण्यात येणार आहे.
‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमामध्ये 6 ते 14 वयोगटातील एकही मुल शाळाबाहय़ राहू नये यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. 100 टक्के पटनोंदणी, 100 टक्के उपस्थिती, गळतीचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी मोफत पाठय़पुस्तके, गणवेश, शालेय पोषण आहार अशा योजना शाळांमध्ये राबविण्यात येत आहेत. शाळेत प्रवेश घेताना बालकाला उत्साहवर्धक व आनंददायी वातावरण ठेवण्यासाठी सर्व शाळांना सूचना करण्यात आल्या आहेत.
शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा व परिसराची सजावट करून नवागतांचे पुष्पगुच्छ, पुष्पहार देऊन स्वागत केले जाणार आहे. त्यांची सवाद्य वाजत-गाजत गाडी सजवून मिरवणूकीने शाळेत आणले जाणार आहे. पटनोंदणी, जाणीवजागृती, शाळाया पहिल्या दिवसापासूना अध्ययनाला प्रारंभ, पहिल्या दिवशी सर्व मुलीं शाळेत उपस्थित राहिल यो नियोजन करावे असे सांगण्यात आले आहे. या उत्सवात शालेय व्यवस्थापन समिती, स्वयंसेवी संस्था व सामाजिक संस्था, महिला बातगट/महिला मंडळे व तरूण मंडळे, गावातील पदाधिकारी, पालक व व ग्रामस्थांना सहभागी करून घेतले जाणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तकदिन साजरा करण्यात येणार आहे. 1 ली ते 8 वी मध्ये शिकणाऱया लाभार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके वितरण करण्यात येणार आहे. 100 टक्के मुलांची उपस्थिती, शाळाबाहय़ मुले याबाबत जनजागृतीपर प्रभातफेरीचे आयोजनही या शाळा प्रवेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर करण्यात येणार आहे.
या नव्या शैक्षणिक वर्षाच्या पूर्वसंध्येला शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर जिल्हाभरात प्राथमिक शाळांची आदल्यादिवशीच साफसफाई। परिसर सुशोभिकरण, शाळी रंगरंगोटी व सजावट करण्याची कार्यवाही परिसरातील ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आली, त्यासाठी ग्रामस्थांची मोलाचे सहकार्य घेण्यात येत होते. शाळारंभाच्या वेळी दाखलपात्र मुलांची यादी दर्शनी भागात लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
जिह्यात जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठय़पुस्तके देण्यात येतात. ही पाठय़पुस्तके विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळतील असे नियोजन करण्यात आले आहे. आज ‘पुस्तकदिन’ साजरा करत पाठयपुस्तकों होणार वितरण
शासनाच्या माध्यमातून मराठी आणि उर्दू शाळांतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तकांचे वितरण करण्यासाठी जि. प. चा शिक्षण विभागाकडे जिह्यातील 1 लाख 4 हजार 156 मुलांसाठी 3 लाख 78 हजार पुस्तके प्राप्त झाली आहेत. आज शाळेचे सत्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी या पाठय़पुस्तकांचे वितरण पुस्तकदिन साजरा करून होणार आहे.
जिह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तकांचे वाटप होणार आहे. योजनेस पा‰ सर्व शाळांना पाठय़पुस्तके प्राप्त होतील यी दक्षता घ्यावी अशा साना जि.प.प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.एम.कासार यांनी दिल्या आहेत.