रत्नागिरी:- बेदरकारपणे मिक्सर चालवून पुढील दुचाकीला मागून धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना 10 जून रोजी सायंकाळी 6.30 वा.आरोग्य मंदिर बसस्टॉपजवळ घडली होती.
उपेंद्र रामभजन सिंह (29, रा.झारखंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मिक्सर चालकाचे नाव आहे. 10 जून रोजी शुभदा विजय सुर्वे (30, रा.भंडारपुळे,रत्नागिरी) या आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच- 08-एई- 2748) वर पाठीमागे अश्विनी प्रथमेश बोरकर हिल घेउन साळवी स्टॉप ते मारुती मंदिर अशी घेउन येत होत्या. त्या आरोग्य मंदिर बसस्टॉपजवळ आल्या असता डाव्या बाजुला बस थांबलेली असल्याने त्या आपली दुचाकी उजव्या बाजुला घेउन पुढे जात असताना पाठीमागून आलेल्या मिक्सर (एमएच- 12-क्यु डब्ल्यू- 0374) ची त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक बसल्याने या दोघींना ही दुखापत होउन त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले होते. याप्रकरणी मिक्सर चालकाविरोधात भादंवि कायदा कलम 279, 337 व मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.