चिपळूण:- विजबिल भरण्यावरून भावाभावात हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९.१५ वाजता कुंभार्ली घागवाडी येथे घडली. यात एकजण जखमी झाला असून तिघांवर अलोरे शिरगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीर रघुनाथ जाधव (३०) असे जखमीचे तर संकेत रघुनाथ जाधव, सूरज रघुनाथ जाधव, सौरभ रघुनाथ जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल झालेले तिघेजण मूळ घरात राहत असून समीर हा मूळ घराच्या शेजारी बांधलेल्या नवीन घरात राहतो. त्याने या घरात नवीन वीज कनेक्शन न घेता मूळ घरातून वीज घेतली आहे.
त्याचे वीजबील भरण्यावरुन त्यांच्यात वाद आहेत. मंगळवारी रात्री ९.१५ वाजता यावरूनच वाद झाला असता तिघांनी समीर याला मारहाण केली. त्यात तो जखमी झाल्याने त्याने दिलेल्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.