रत्नागिरी:- तालुक्यातील गावडे आंबेरे येथील बावकर घाटीतील उतारात दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात माय-लेकाचा मृत्यू झाला. अपघाताची ही घटना गुरुवार 13 जून रोजी दुपारी 1.30 वा. सुमारास घडली.
सुनंदा रघुनाथ गुळेकर (70), समीर रघुनाथ गुळेकर (45, दोन्ही रा.मावळंगे, रत्नागिरी) अशी अपघातात मृत्यू झालेल्या माय-लेकांची नावे आहेत. गुरुवारी दुपारी रघुनाथ आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच -08-एन- 4363) वरुन आई सुनंदा गुळेकर हिला घेउन डोर्ले ते मावळंगे असा येत होता. तो गावडे-आंबेरे येथील बावकर घाटीतील उतारात आला असता त्याची दुचाकी घसरली. त्यामुळे दोघेही रस्त्यावर आपटल्याने त्यांना गंभिर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.