रत्नागिरी:- तालुक्यातील ओरी-मठकरी फाटा येथे मोटारीची रिक्षाला धडक झाली. या अपघातामध्ये रिक्षा चालक जखमी झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धेश विनायक देसाई (२४, रा. ओरी, गावठवाडी, रत्नागिरी) असे संशयित मोटार चालकाचे नाव आहे. ही घटना ३१ मे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ओरी सोसायटीच्या जवळील रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी लहु देवदास जाधव (रा. ओरी, बौद्धवाडी, रत्नागिरी) हे आपल्या ताब्यातील रिक्षा (क्र. एमएच-०८ एक्यू ७७५७) घेऊन ओरी ते जाकादेवी असे जात असताना मठकरी फाटा येथे जाकादेवीहून येणारी मोटार (क्र. एमएच-०८एपी ६०११) वरिल चालक सिद्धेश देसाई याने मोटार निष्काळजीपणे चालवून मोटार रस्त्याच्या उजव्या बाजूला आणून रिक्षाला ठोकर दिली. या अपघातात रिक्षा चालक जखमी झाला व दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार किशोर जोशी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.