रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद खंडाळा येथील प्रौढ घराशेजारील विहिरीत बुडालेल्या अवस्थेत मिळून आला. ही घटना बुधवार 12 जून रोजी सकाळी 10.55 वा.उघडकीस आली.
संजय विश्वनाथ बोरकर (55,मुळ रा.वरवडे भंडारवाडा सध्या रा.वाटद खंडाळा जांभारी फाटा,रत्नागिरी) असे विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. बुधवारी सकाळी ते घरात कोठेही दिसून न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी घराच्या आजूबाजूला त्यांचा शोध घेतला असता त्यांना शेजारी असलेल्या विहिरीत त्यांचा मृतदेह पाण्यात बुडालेल्या स्थितीत दिसून आला. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.