दोन दुचाकीमध्ये धडक; स्वाराविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील तोणदे ते रत्नागिरी रस्त्यावरील सोमेश्वर बस स्टॉप येथे दोन दुचाकीमध्ये धडक झाली. यामध्ये एक जण जखमी झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम दत्ताराम जोशी (२६) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ६) दुपारी चार च्या सुमारास तोणदे ते रत्नागिरी जाणाऱ्या रस्त्यावर सोमेश्वर येथील बस स्टॉप येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित शुभम जोशी हे फ्लीप कार्ड मधील कुरीअरची मोठी बॅग पाठीवर लावून दुचाकी (क्र. एमएच-०८ एएच ५९७२) घेऊन तोणदे ते रत्नागिरी असे येत असताना सोमेश्वर येथील भातडेवाडी ते साई भवानी बस स्टॉप येथील रस्त्यावर आले असता खबर देणार यांचे भाऊ अशोक कृष्णा भाटकर यांच्या ताब्यातील दुचाकी (क्र. एमएच-०८ बीए ६११०) ला धडक दिली. या अपघातात संशयित जोशी यांची पाठीवरील बॅगचा भाटकर यांना धक्का लागून ते गाडीसह रस्त्यावर पडले. त्यांना दुखापत झाली व नुकसान झाले. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार सुनिल सावंत यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.