पावसाच्या हजेरीनंतर जिल्ह्यात भात पेरणीच्या कामाला जोर

रत्नागिरी:- सलामीलाच जोर धरणार्‍या मोसमी पावसाने मागील दोन दिवस हलक्या सरींचा राबता ठेवला. गेले दोन दिवस दमदार कोसळल्यानंतर आता रत्नागिरीसह कोकणातील खरीप क्षेत्रात आता लावणीचा पेरा टाकण्याची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी पावसाने उसंत घेतली. मात्र, दुपारनंतर काही भगात जोरदार पावसाने पुन्हा हजेरी लावली. सलामीलाच जोर धरणार्‍या पावसाचा जोर पढील दोन दिवस वाढणार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

गेल्या तीन चार दिवसांपासून कोकण किनारपट्टी भागात पावसाने हजेरी लावली होती. मात्र, 8 जून पासून मोसमी पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात सक्रीय झाला. अनेक भागात गेल्या शनिवारी आणि रविवारी जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाला. सलामीलाच जोर धरणार्‍या पावसाचा जोर पढील दोन दिवस वाढणार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
किनारपट्टी भागातील ठाणे जिल्ह्याचा अपवाद वगळता पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर सवार्धिक होता. गेले 4 दिवस रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. सकाळी ढगाळ वातावरण, पण दुपारनंतर पावसाचा जोर वाढत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गेले दोन दिवस बहुतांश तालुक्यात 50 मि. मी. पेक्षाही जादा पाऊस झाला. जोरदार सलामीनंतर आता मोसमी पाऊस चांगलाच सक्रीय झाला आहे. रविवारी रत्नागिरी जिल्ह्यात 46.10 मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद झाली तर सोमवारी पावसाने सकाळी उसंत घेत वातावरणातील मळभ काही काळ दुरू केले. मात्र त्यानंतर काही भागात हलक्या तर काही भागात मध्यम स्वरुपाच्या सरींची आवक जावक सुरू होती. दोन दिवस पावसाच्या दमदार हजेरीनंतर आता रत्नागिरी जिल्ह्यातील भात क्षेत्रात रोपवाटीका तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे तर काही भागात हलक्या भिजलेल्या जमिनीची उकळ करुन घेण्याच्या कामाला वेग आला.