जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली नासातील विज्ञान विश्वाची अनुभूती

रत्नागिरी:- अमेरिकेतेतील अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ ला भेट देण्यीची संधी लाभलेल्या जिल्हा परिषदाया प्राथमिक शाळांमधील रत्नागिरीकर 20 विद्यार्थ्यांना तेथील अंतराळ विज्ञान विश्वी अनुभूती दिली जात आहे. तेथील अंतराळ मोहिमाया माहिता एक भाग होणे, जंबो जेट, रॉकेटचे डिझायनिंग, कोडिंग आणि अंतराळवीरांशी संवाद साधण्याची आणि अवकाश तंत्रज्ञानातील घडामोडी जाणून घेण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळाली आहे.

जिल्हा परिषदेमार्फत यावर्षी देखील जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अतरांतराळ संशोधनाबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी नासा (अमेरिका) येथे सफर घडविण्यात आली आहे. त्यासाठी यावेळेस जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या चाळणी परिक्षेत निवड झालेले मंडणगड-ओम शैलेश कोबनाक, आक्षा संदिप आग्रे, दापोली-मानिनी मंगेश आग्रे, शुभम जयंत जोशी, खेड- सार्थक प्रकाश महाडिक , किर्ती केशव मुंढे, चिपळूण- दक्ष दिनेश गिजये, इच्छा सिताराम कदम, गुहागर- विराज विष्णू नाचरे, पूर्वा उमेश जाधव, संगमेश्वर- प्रसाद सतीश धामसेकर , स्वराज दिलीप पाक्तेकर, सिध्दी भिमराव पाटील, रत्नागिरी- ऋषभ गौतम गायसमुद्रे, श्रेया संदीप आग्रे, लांजा- प्रणव लक्ष्मण कोलगे, सुमेध सचिन जाधव, राजापूर-जस्लिन फैय्याज हाजू, शर्वरी सुघोष काळे, शमिका संतोष शेवडे या विद्यार्थ्यांना ही सफर घडवण्यात आली आहे. हे सर्व विद्यार्थी गेल्या आठवडय़ात नासा भेटीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाया माध्यमातून अधिकारी, शिक्षक अशी 6 जणीं टिम त्या विद्यार्थ्यांसोबत आहे. त्यासाठी जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यापूर्वीच सर्वतोपरी सहकार्य दिलेले आहे.

थेट अमेरिकेतील ‘नासा‘च्या स्पेस कॅम्पमध्ये या भेटीत स्पेस सेंटर, हय़ुमन मुन 2, नासा मिशन माहिती, केनेडे स्पेस सेंटर, शटल प्रक्षेपण, स्मिथ रोनियन म्युझियम, 14 शिक्षण आणि संशोधन केंद्रे, शैक्षणिक मॉडेल्स, आयमॅक्स थ्री डी इफेक्ट अशा ठिकाणी या विद्यार्थ्यांया भेटी दिल्या जात आहेत. तसा तेथे ‘फ्लाइट सिम्युलेशन, एअरोनॉटिक्स, मॉडेल रॉकेट लॉँचिंग, मूनवॉक, रॉकेट डिझायनिंग, अंतराळवीरांशी संवाद, तज्ञांची व्याख्याने आदींबाबत या विद्यार्थ्यांना माहिती दिली जात आहे. 17 जूनपर्यंत विद्यार्थ्यां हा नासा दौरा राहणार आहे.