गावखडी समुद्र किनाऱ्यावर पिवळ्या रंगाचा तवंग

रत्नागिरी:- तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर पिवUया रंगाचा तवंग आला आहे.मच्छीमारी अथवा कोणत्याही इतर गोष्टीसाठी किनार्यावरती आलेला हा तवंग धोकादायक नसून उधाणाच्या भरतीमुळे अशा प्रकारचा तवंग अथ्ावा डांबराचे गोळे येत असतात असा अंदाज स्थानिक मच्छिमारांनी व्यक्त केला आहे.

समुद्रामध्ये मच्छीमारी बोटी पावसाळयाच्या पूर्वसंध्येला साफसफाई अथवा बोटिंगची दुरुस्ती करत असताना त्या माध्यमातून वापरण्यात येणारे ऑइल त्याचबरोबर इतर गोष्टींचा वापर केला जातो. ते करत असताना पाण्यात सांडल्यामुळे त्याचा तवंग त्याचबरोबर काळे ऑइल डांबराच्या रूपाने उधाणाच्या भरतीमुळे समुद्रकिनारी दिसत असते. त्याचा मच्छीमारी अथवा कोणत्याही गोष्टीला त्रास होत नाही.
या संदर्भात गावखडी पोलिसपाटील बिर्जे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, दरवर्षी अमावस्येच्या दरम्याने उधाणाची भरती येते. समुद्र आपल्या पोटामध्ये काही ठेवत नसल्यामुळे तो उधाणाच्या भरतीच्यावेळी समुद्रकिनार्यावरती पाठवत असतो. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना वाटते की, काहीतरी रसायन काही कंपन्यांनी सोडले आहे की काय? दरवर्षी असा प्रकार घडत असतो. कारण, समुद्रामध्ये अनेक मोठमोठ्या मच्छीमार बोटी कार्यरत असतात. त्या माध्यमातून समुद्रात कुठेही काही बोटीच्या संदर्भात काही घडले अथवा काही टाकले ते या उधाणाच्या भरतीच्या माध्यमातून किना]र्यावर येते.

मच्छीमारांत भीतीचे वातावरण
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनार्यावर पिवUया रंगाचा तवंग आला आहे. हा तवंग म्हणजे मोठ्या बोटीतील हे रसासयन सोडण्यात आले आहे का? की बोट नादुरुस्त झाली आहे का? पाण्यातील हा तवंग आरोग्यासाठी आणि माशांसाठी घातक असू शकेल का? असे विविध प्रश्न, शंकाकुशंका मच्छीमारांच्या मनात येत होत्या. मात्र त्याचे कारण स्पष्ट झाल्याने त्यांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.