राजिवडा येथे वृद्धेच्या गळ्यातील मंगळसुत्र लंपास

रत्नागिरी:- शहराजवळील राजिवडा-बुड्ये मशीद येथील वृद्ध महिला झोपलेली असताना तिच्या गळ्यातील ५० हजाराचे मंगळसुत्र चोरट्याने पळविले. चोरट्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ७) दुपारी पावणेतीनच्या सुमारास राजिवडा-बुड्ये मशीदीजवळ घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध महिला सौ. सुफिया अब्बास बुड्ये (वय ७५, रा. बुड्ये मशिदीजवळ-राजिव़डा, रत्नागिरी) या शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास घरात झोपलेल्या असताना चोरट्याने घराचा पाठच्या दरवाजाने यात येऊन वृद्ध महिला सौ. बुड्ये या गाढ झोपलेल्याचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील ५० हजाराचे सोन्याचे मंगळसुत्राची चोरी केली. या प्रकरणी सौ. सुफिया बुड्ये यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.