साठरेबांबर येथील महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील साठरेबांबर येथील महिलेच्या पायाला सुज येऊन दुखू लागल्याने तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. सौ. स्नेहल संतोष लिंगायत (वय ४८, रा. खोचाडेवाडी-साठरेबांबर रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ४) सकाळी साडेसातच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लिंगायत यांना एक आठवड्यापासून पायाला सुज येऊन दुखत होता. पाली येथे व रत्नागिरीत खासगी दवाखान्यात उपचार सुरु होते. मंगळवारी पायाची सुज आणि पाय दुखु लागल्याने प्रथम पाली येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.